आमच्याबद्दल

     
         
 

नमस्कार मी राज नामदेव मेस्त्री, माझी स्वतःबद्दल ओळख करून द्यावी इतका मी मोठा नाही. पण ज्या गोष्टी मला सुचल्या त्या मी आपणासमोर मांडत आहे.

आजच्या गतिमान काळाबरोबर तितक्याच वेगाने वाटचाल करायची असेल तर वेबसाईटच्या माध्यमातून ते सहज शक्य आहे. आपल्या कला, साहित्य, व्यापार यांना स्थानिक पातळीवरून जागतिक बाजारपेठेपर्यंत नेण्याचे काम वेबसाईटच्या माध्यमातून सुकर होत आहे.

येत्या काही वर्षांचे सर्वेक्षण केले तर आपणास असे दिसून येईल की, ईंटरनेटवर आपला मराठी वर्ग ब्लॉग सारख्या माध्यमातून आपले स्वतंत्र विचार मांडत आहेत.

आपल्या मनातील कल्पना, कवितासंग्रह, साहित्य या सार्‍यांच गोष्टींना वेबसाईटच्या माध्यमातून वाव मिळत आहे. तसेच ईपेपर, न्युज वाहिन्या, खगोलशास्त्र, पाककृती, करमणूक अशा विविध विषयांच्या वेबसाईट आपण पाहत आपण त्यासंबंधीत माहीती मिळवत असतो.

खास करून मार्केटिंगचा फंडा म्हणून वेबसाईट फार उपयुक्त ठरत आहे. आंतरराष्ट्रीय बॅंकापासून ते थेट पान विकणार्‍या माणसांची वेबसाईट आता बनलेली आहे. आश्चर्य झालात ना, पण ही थट्टा नसून आपण आपल्या माहीतीसाठी www.muchhadpaan.com तसेच www.freshpaan.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. यातून सांगायची गोष्ट एवढीच की, आपणच मागे का आहोत. असाच बदल लक्षात घेऊन मी सुद्धा वेबसाईट बनविण्याच्या दालनात प्रवेश केला आहे. यासाठी एक संधी आपण मला जरूर द्याल अशी मी आपणाकडून आशा करतो.